Slider Image
ताजी बातमी

गावाविषयी माहिती

वाकद  हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पूर्व भागात गोई नदीच्या काठावर वाकद हे गाव  गाव आहे.नदीच्या काठावर ग्रामदैवत कालिका माता मंदिर आहे. या ठिकाणी अनेक भाविक दर्शनास येतत. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३१७९  आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २ , अंगणवाडी केंद्रे ४ व व्यायामशाळा १,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०१५ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत वाकद  ने खास ग्रामस्थांसाठी RO प्लांट बसविलेला असून गावातील १००% कुटुंब RO च्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,  तसेच  मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष  ऊस कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात

वाकद  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सोनगाव गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये  वाकद  विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत सन २०१३-२०१४ पारितोषिक प्राप्त गाव बक्षीस रुपये-४ लक्ष रुपये  प्राप्त झाला असून स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा व तालुका  पातळीवर मिळाला आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ११ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

वाकद  गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

वाकद  हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २८  कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ७९७ .७२ हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ४ वार्ड आहेत. एकूण ५२० कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ३२९०  आहे. त्यामध्ये १७६९  पुरुष व १५२१  महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत अवघ्या १ किमी अंतरावर गोदावरी नदी असून  गावातून कडवा पाट जात असून रोटेशन मध्ये ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

सोनगाव गाव द्राक्ष कांदा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

लोकजीवन

वाकद  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

वाकद च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

लिंग संख्या
पुरुष १७६९
स्त्री १५२१
एकूण ३२९०

संस्कृती व परंपरा

वाकद  गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात गोई नदीच्या काठावर कालिका माता मंदिर आहे  मोठ्या उत्साहात दर वर्षी  ३ दिवस भरवली जाते,व नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्यात प्रामुख्याने कावड रथ मिरवणूक हे आकर्षण आहे , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे वाकद गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख कालिका माता मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

शेती क्षेत्र व द्राक्षबागा – वाकद  द्राक्ष उस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, द्राक्षबागा आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.

जवळची गावे

वाकद गाव निफाड तालुक्यातील पूर्व भागात असलेले गाव आहे. आजू बाजूला शिरवाडे,कानळद,देवगाव मानोरी,सत्यगाव,मुखेड   हि   गावे वाकद ला सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

ग्रामपंचायत प्रशासन


अ.न. सदस्याचे नाव पद मोबाईल क्रमांक
भवर रेखा नवनाथ सरपंच ७०२०८३५२०५
वाळूंज ओंकार रवींद्र उपसरपंच ९५५२३६३५५४
बडवर विजय श्रावण सदस्य ९५४५२४९१४६
शिंदे रामचंद्र भीमराव सदस्य ९७३०५६७२८९
बडवर अरुण रामभाऊ सदस्य ९८२३६४८५१६
भवर नवनाथ विष्णू सदस्य ७०२०८३५२०५
गायकवाड सविता अनिल सदस्या ९९६०३९४५५८
भवर कमल संजय सदस्या ८३९०२८४३४०
पाटील सरला सतीश सदस्या ९७६४४५२६२५
१० गांगुर्डे नलिनी अण्णासाहेब सदस्या ९९६०३९४५५८
११ बच्छाव माया दिलीप सदस्या ८३९०२८४३४०
१२ प्रवीण भवान भोये ग्रामपंचायत अधिकारी ७५०७८३६३७४

लोकसंख्या आकडेवारी


690
3290
1769
1521
Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6